फक्त मुद्द्याचं!

27th June 2025
महाराष्ट्र

पुण्यात नामांतरावरून लागलेल्या बॅनरवर संताप; खासदार कुलकर्णी यांना रडू कोसळले!

पुण्यात नामांतरावरून लागलेल्या बॅनरवर संताप; खासदार कुलकर्णी यांना रडू कोसळले!

पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवा यांचे नाव देण्याची मागणी

पुणे : पुण्यातील रेल्वे विभागीय बैठकीत पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवा यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे . या विरोधात विविध संघटनांनी पुढे येऊन पुणे रेल्वे स्टेशनला विविध नावे देण्याची मागणी केली आहे .मात्र सोशल मीडिया आणि बॅनरबाजीवर अमर्याद भाषा वापरल्यामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांना रडू कोसळले.

पुणे रेल्वे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद सध्या उभाळून आला आहे थोरले बाजीराव यांचे नाव दिले पाहिजे अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केल्यावर त्यात अनेकांनी उड्या घेतल्या पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे काही संघटनांनी महात्मा फुले यांचे नाव द्यावे असे देखील मागणी केली आहे पुण्यातील राणी लक्ष्मीबाई चौकात शिवसेना उबाठा गटाने एक पोस्टर झळकवले असून शहरात विविध ठिकाणी खोचक बॅनर झळकलेले आहेत .या बॅनर मध्ये कोथरूडच्या बाईला नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेला मस्तानी चे नाव द्यावे असा मजकूर होता .या बॅनर वरून पहिल्यांदाच मेधा कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे . बॅनर वरील मजकुरा बद्दल बोलताना त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला . देशात लोकशाही आहे, लोकशाहीनुसार कोणीही काहीही मागणी करू शकतो .

आपण बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे ही मागणी केली . परंतु बुधवार पेठेला मस्तानी चे नाव द्यावे ही मर्यादा लोकशाहीला सोडून आहे . आम्ही नाव द्या म्हटले पण निर्णय घेणारे वेगळे असतात .आम्ही अर्ज केला आहे .आमच्यावर टीका होऊ शकते ,पण त्याला ताळतंत्र असावा . मी जगभरात प्रवास करताना साडी नेसून गेले असे पोस्टर लावले, त्यामुळे खूप वाईट वाटले .काळ सोकाऊ नये म्हणून अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे .कोणत्याही टीकेला मर्यादा तर पाहिजेच .महिलावर्ग म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला बोललेच पाहिजे असे सांगताना त्यांना रडू कोसळले.

viarasmall
viarasmall
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"