आर्थिक कारणावरून महिलेला मारहाण

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : रिक्षाचे राहीलेले पैसे देण्याच्या कारणावरुन भांडण होण्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी पिंपरीत घडला. यामध्ये फिर्यादी महिला व तिचे पती यांना मारहाण आणि शिवीगाळ केली केली आहे. तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आर्थिक कारणातून महिलेला मारहाण झाल्याची घटना गुरूवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास मिलिंदनगर, पिंपरी येथे घडली. तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, मंगल संजय म्हस्के (वय ३७), रोहित संजय म्हस्के (वय २२) आणि प्रेम संजय म्हस्के (वय १८, सर्व रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुरूवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास मिलिंदनगर, पिंपरी येथे आरोपींनी आपसांत संगनमत करून रिक्षाचे राहिलेले पैसे देण्याच्या कारणावरुन भांडण केले. यामध्ये फिर्यादी महिला व तिचे पती यांना शिवीगाळ केली. आरोपी प्रेम म्हस्के याने फिर्यादी महिलेला लोखंडी पाइपने डोक्यामध्ये मारुन जखमी केले. तसेच घरावर दगडे फेकून मारले, असे तक्रारीत नमूद केले आहे.