फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
विधानसभा २०२४

खरा शिवसैनिक ठाकरेंसोबतच, महाविकास आघाडीधर्म पाळणार : खासदार संजय राऊत

खरा शिवसैनिक ठाकरेंसोबतच, महाविकास आघाडीधर्म पाळणार : खासदार संजय राऊत

चिंचवडमध्ये परिवर्तन निश्चित; राहुल कलाटे आमदार होणार

चिंचवड : अत्यंत वाईट परिस्थितीत सुद्धा निष्ठावंत, सच्चे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिले आहेत. त्यामुळे चिंचवडमध्येही सच्चा शिवसैनिक स्वतःहून पुढे येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. चिंचवडमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने विजयी होतील असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. १५) दुपारी कलाटे यांच्या वाकड गावातील जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. दरम्यान त्यांनी येथील स्थानिक नागरीकांशी व माध्यमांच्या प्रतिनिधिंशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले, कालच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत कॅम्पेन झाले. यामध्ये लाखभर खुर्च्या ठेवल्या होत्या मात्र या कॅम्पेनसाठी पाच हजारही नागरिक उपस्थित नव्हते. त्यामुळे २३ तारखेनंतर खरे चित्र सर्वांसमोर असेल. मुख्यमंत्रीपदी आता जरी एकनाथ शिंदे असले तरी २३ तारखेनंतर शिंदे यांचे भविष्य अंधकारमय असेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून १६० ते १६५ जागा आम्हाला या निवडणुकीत मिळतील, असे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच असेल. महाराष्ट्रात होत असलेल्या शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या सभेला मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहता जनतेने सत्ता बदल करण्यासाठी ही निवडणूक हाती घेतलेली आहे असेही राऊत म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेना उबाठाचे मावळ लोकसभा संघटक संयोग वाघेरे, माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, संघटिका अनिता तुतारे, शिवसेना शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, युवासेना प्रमुख चेतन पवार यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१७ तारखेला शिवतीर्थावर सांगता सभा होणारच!
येत्या १७ तारखेला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रभरातून शिवसैनिक या स्मृतीथळाला वंदन करण्यासाठी येत असतात. जर प्रशासनाला या सभेसाठी परवानगी द्यायची नसेल तर येणाऱ्या शिवसैनिकाला अडवलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने ठरवावं काय करायचं ते. मात्र १७ तारखेला शिवतीर्थावरती सांगता सभा होणारच.

फेक नेरिटीव्ह हा आमचा शब्द नाही
देवेंद्र फडणवीस काय बोलतात यावरती आता महाराष्ट्र चालत नाही. फेक नेरिटीव्हवरती त्यांनी २०१४ साली राज्य आणलं. ही संकल्पना आता त्यांच्यावर उलटताना दिसून येत आहे. ‘फेक नॅरेटिव्ह’ हा त्यांचा शब्द आहे. आमचा नाही.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"