चाहत्यांना उद्देशून काय म्हणाला अल्लू अर्जुन?

प्रिमिअरवेळी चेंगराचेंगरी प्रकरणानंतर तेलुगु सिनेस्टार अल्लू अर्जुनचे चाहत्यांना आवाहन
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा वापरू नये किंवा वर्तन करू नये, असे आवाहन तेलुगु सिनेस्टार अल्लू अर्जुनने आपल्या चाहत्यांना केले आहे. थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रमोशन प्रसंगी चेंगराचेंगरी प्रकरणानंतर अल्लू अर्जुनने ही खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
अल्लू अर्जुन याचं फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे. केवळ तेलुगु किंवा दाक्षिणात्य चाहतेच नाहीत, तर देशभरात अल्लू अर्जुनचे चाहते आहेत. अलिकडेच त्याच्यावर झालेल्या नव्या आरोपांदरम्यान तेलुगू सिनेस्टार अल्लू अर्जुनने रविवारी त्याच्या चाहत्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा किंवा वर्तन करू नये असे आवाहन केले आहे.
अल्लू अर्जुनने एक्सवर लिहिले आहे की, माझ्या सर्व चाहत्यांनी त्यांच्या भावना जबाबदारीने व्यक्त कराव्यात, असे मी आवाहन करतो. ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा किंवा वर्तन करू नका. फेक आयडी आणि फेक प्रोफाईलद्वारे स्वतःला माझे चाहते म्हणून चुकीचे चित्रण करणाऱ्यांपैकी कोणी अपमानास्पद पोस्ट केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. मी चाहत्यांना विनंती करतो की अशा पोस्ट्समध्ये गुंतू नका.
अल्लु अर्जुन याने काय म्हटले आहे ते वाचा..
https://x.com/alluarjun/status/1870768638481039489?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1870768638481039489%7Ctwgr%5E3b3809f6f3e8ef95805c62c228fe282ee7a47f0d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.aajtak.in%2Fentertainment%2Fstory%2Fallu-arjun-appeals-to-fans-post-responsibly-strict-action-will-be-taken-1141952-2024-12-22
चार डिसेंबर रोजी हैदराबादमधील सिनेमागृहात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती असताना एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला होता. त्याच् सिनेमाच्या प्रीमिअरच्या वेळी हजारो चाहत्यांनी त्याची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती.