फक्त मुद्द्याचं!

7th September 2025
महाराष्ट्र

‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा : विभागीय आयुक्त

‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा : विभागीय आयुक्त

पुणे : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. ही यात्रा ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत ९ जून २०२५ पासून सुरू होत आहे. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

या ५ दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

viarasmall
viarasmall

यात्रेदरम्यान गडकोटावर : ऐतिहासिक स्थळी पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत.

🔶 सहल तपशील –
 सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट,  शुभारंभ दिनांक: ९ जून २०२५
🚆 यात्रेचा प्रवासमार्ग –
मुंबई (सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर-प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा- मुंबई.

🏰 प्रमुख स्थळांची माहिती –
 रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
 लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
 कसबा गणपती व शिवसृष्टी,पुणे –पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
 शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
 भीमाशंकर ज्योतिर्लिंग – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
 प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
 कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर
 पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

🗓️ दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त): –
 पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे.
 दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती).
 तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे.
 चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर.
 पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई.
 सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).
📌 आरक्षण व अधिक माहिती साठी संकेतस्थळ- www.irctctourism.com

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"