अजित गव्हाणे यांचा मतदारांशी संवाद

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी शनिवारी गाठीभेटींवर भर दिला. भोसरी मतदारसंघातील पक्षाचे जुने पदाधिकारी, नागरिक ,कामगार ,मित्र परिवार यांच्या गाठीभेटी घेत येत्या २० नोव्हेंबर रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्ह समोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले.
अजित गव्हाणे यावेळी म्हणाले, गेली २० वर्षापासून मी नगरसेवक म्हणून काम करत आहे. यापूर्वी देखील विधानसभा निवडणुकीसाठी मला विचारणा करण्यात आली होती. आता परिस्थिती वेगळी आहे .प्रत्येकाला त्रास होत आहे. या विरोधात प्रत्येक जण पुढे आला आणि त्यांचा फक्त चेहरा मी झालो. या शहरामध्ये विकासाचे, विस्तारीकरणाचे प्रचंड ”पोटेन्शिअल” आहे. कारखानदारी, चांगल्या सुविधा, प्रशस्त रस्ते या माध्यमातून या शहराने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
मात्र गेल्या दहा वर्षात ही ओळख पुसण्याचे काम कुठेतरी होत आहे. त्यामुळे मला पुढे येण्यासाठी अनेकांकडून सांगण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी संधी दिली . एक व्यक्ती नाही तर प्रवृत्तीच्या विरोधात माझी लढाई सुरू आहे. माझ्याशी या लढाईत प्रत्येक जण जोडला जात आहे. कारण प्रत्येक जण गेल्या दहा वर्षात कोणत्या ना कोणत्या त्रासाला सामोरा गेला आहे असे यावेळी अजित गव्हाणे म्हणाले.