फक्त मुद्द्याचं!

15th April 2025
पुणे

ॲग्री हॅकॅथॉन संकेत स्थळाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन!

ॲग्री हॅकॅथॉन संकेत स्थळाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन!

पुणे : देशातील पहिली आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉन जूनमध्ये पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. विधान भवन येथे ॲग्री हॅकॅथॉन संकेत स्थळाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली .

ॲग्री हॅकॅथॉन याबाबतची स्पर्धा जिल्हा प्रशासन कृषी विभाग कृषी महाविद्यालय पुणे व आत्मा यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे .स्पर्धकांना या संकेतस्थळावर 5 मे पर्यंत अर्ज करता येतील ,आलेल्या अर्जाची पडताळणी करून 15 मे पर्यंत स्पर्धकांची यादी अंतिम करण्यात येईल .स्पर्धेसाठी निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येत आहे. स्पर्धेकरिता कृषी विद्यापीठे ,भारतीय कृषी अनुसंधान संस्था संशोधन केंद्रे यांचे तज्ञ मार्गदर्शन घेण्यात येत आहे. कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स, तसेच बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर आदी संस्था यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. स्पर्धेमध्ये कृषी व कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान शाखेचे विद्यार्थी, संगणक अभियंते आदी स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवतील.

viara ad
viara ad

कृषी क्षेत्रातील विविध समस्यांचे आठ प्रकारात वर्गीकरण केले असून त्यावर स्पर्धकांनी उपाययोजना शोधायचे आहे. सर्वोत्तम सोल्युशन सादर करणाऱ्या स्पर्धकाची प्रत्येक गटात प्रथम व द्वितीय पारितोषिकाकरिता तज्ञ समितीमार्फत निवड करण्यात येणार आहे .प्रथम विजेत्यास 25 लाख व द्वितीय विजेत्यास पंधरा लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले जाईल .स्पर्धकांकडून आलेल्या उपाययोजना व सोल्युशन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता त्यांचे उत्पादन व विपणन प्रोत्साहन म्हणून हे पारितोषिक देण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"