ओबीसींचेही आता उपोषणास्त्र

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
जालना, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर आता ओबीसी समाज सुद्धा आता रस्त्यावर उतरला आहे. आंतरवाली सराटी येथील बडीगोद्री ते आंतरवाली रोडवर उपोषणाला त्यांनी सुरुवात केली. ओबीसींचे कार्यकर्ते मंगेश ससाणे यांनी हे उपोषण सुरू केले आहे.
अंतरवाली सराटीला जाणारा येणारा रस्ता देखील पोलिसांनी बंद केला आहे. ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु होताच, याच ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने लावण्यात आला आहे. उपोषणकर्ते लक्ष्मण हाके देखील वडीगोद्री फाट्यावर उपोषण करणार आहेत. हाके आणि ससाणे यांचे उपोषण वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असेल. वडीगोद्रीमध्ये दोन ओबीसी आंदोलन सुरू झाल्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. याबरोबरच आता नवनाथ वाघमारे देखील आंदोलन करणाच्या तयारीत आहेत. आता वाघमारे कुठे आंदोलनाला बसणार? वेगळे बसणार की हाके यांचा सोबत बसणार? की मंगेश ससाणे यांचा सोबत बसणार? असा प्रश्न स्थानिक प्रशासनाला उद्भवला आहे.