फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

नोएल टाटांच्या हाती ट्रस्टची धुरा

नोएल टाटांच्या हाती ट्रस्टची धुरा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या सर्वोच्च पदाची जागा रिक्त झाली आहे. टाटा समुहाची मूळ कंपनी, टाटा सन्सचा कंपनीत ६६% हिस्सा आहे. त्यांच्यानंतर आता ट्रस्टची जबाबदारी नोएल टाटा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

टाटा ट्रस्टचे दिवंगत अध्यक्ष रतन टाटा हे विवाहित नव्हते आणि त्यांनी मृत्यूपूर्वी उत्तराधिकारी नियुक्त केला नव्हता त्यामुळे, नुकत्याच पार पडलेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शंभर देशांमध्ये पसरलेल्या टाटा समूहाच्या विशाल व्यावसायिक साम्राज्याचे नेतृत्व आता नोएल टाटा करतील. बैठकीत सर्वांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला असून याअंतर्गत नोएकल यांची टाटा समूहाच्या सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट या दोन महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी नोएल टाटा या संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत होते तर आता त्यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत नोएल टाटा
नोएल टाटा याआधी सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त होते. मागील चाळीस वर्षांपासून टाटा समूहात कार्यरत नोएल टाटा यांनी टाटा समुहाच्या अनेक कंपन्यांच्या बोर्डात सक्रिय सहभाग नोंदवला. टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, वोल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि टाटा स्टील तथा टायटन कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. टाटा ट्रस्टच्या स्थापनेत रतन टाटा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा मोठा हिस्सा आहे. टाटा ट्रस्टचा टाटा समूहात सुमारे ६६ टक्के हिस्सा असून टाटा समूह टाटा ट्रस्ट अंतर्गत कार्यरत आहे. टाटा ट्रस्ट परोपकारी उपक्रम आणि प्रशासनावर देखरेख करण्यासाठी काम करतो.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"