काय सांगतात एक्झिट पोल?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : राज्यभरात विधानसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष निकाल काय लागणार याकडे लागून राहिले आहे. त्यापूर्वी मतदान संपताच एक्झिट पोल समोर आला आहे. भाजपाला अन्य पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक मते मिळणार असली तरीही महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आले आहेत. म्हणजे सत्तांतर होईल, असे सांगितले जाते. तर काही पोल महायुतीलाच बहुमत मिळेल, असे सांगत आहेत.
पुण्यातील चाणक्य संस्थेने केलेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १५२ ते १६० जागा मिळतील, असे सांगितले जात आहे आणि महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागा मिळू शकतात. तसंच ६ ते ८ जागा अन्य पक्षांच्या येतील.
मॅट्रिजचा अंदाज असा आहे की भाजपाला ८९ ते १०० जागा मिळतील, शिवसेनेला ३७-४५, राष्ट्रवादीला १७-२६, काँग्रेसला ३९-४७, शिवसेना (उबाठा) २१-१९, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) – ३५-४३ आणि इतरांच्या वाट्याला ६ ते ८ जागा येतील, असे सांगितले जात आहे.
ए्क्झिट पोलनुसार भाजपा मताधिक्यात दिसत असले तरीही सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मित्रपक्षांना जवळ करावेच लागणार आहे. भाजपाला एकहाती सत्ता मिळण्याची शक्यता खूप धूसर आहे.
पोल ऑफ पोल असं सागतो की, महायुतीला १४० जागा मिळतील. त्यानंतर महाविकास आघाडीला १३० आणि इतर पक्षांना १८ जागा मिळतील. सगळ्या एक्झिट पोलकडे असे संमिश्र अंदाज असल्यामुळे सरकार नेमके कोणाचे स्थापन होईल, याची सध्या काहीच खात्री देता येणार नाही.