फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT-N2 अवकाशात झेपावले!

भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT-N2 अवकाशात झेपावले!

फ्लोरिडा : भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT-N2 अवकाशात झेपावले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे हे सॅटेलाईट उद्योगपती इलॉन मस्क यांनी यांच्या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. याचे कार्य सुरू झाल्यानंतर भारताची दळणवळण व्यवस्था अधिक बलशाली होईल, असे सांगितले जात आहे.

भारताचे स्वतःचे रॉकेट मार्क-3 हे केवळ 4,000 किलो वजनाचे सॅटेलाइट अथवा उपग्रह अवकाशात घेऊन जाऊ शकते. मात्र, GSAT-N2 चे वजन 4,700 किलो एवढे आहे, जे खूप अधिक आहे. यामुळे इस्रोने स्पेसएक्स या अमेरिकन कंपनीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. इस्रोसाठी दुसऱ्या कंपनीचे रॉकेट वापरण्याची ही पहिलीच वेळ असेल.

या सॅटेलाइटच्या सहाय्याने दुर्गम भागांतही इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. GSAT 20 चे मिशन लाइफ 14 वर्षं एवढे आहे आणि जमिनीवरील पायाभूत सुविधा सॅटेलाइटच्या मदतीसाठी तयार आहे.

आतापर्यंत भारतात फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याची परवानगी नव्हती. मात्र, आता सरकारच्या बदलत्या नियमांनुसार इंटरनेट वापरण्यास परवानगी आहे . आता विमान 3000 मीटर एवढ्या उंचीवर पोहोचल्यानंतर प्रवाशांना आपल्या मोबाईलवर इंटरनेट चालवता येईल. याच बरोबर, प्रवाशांना वाय-फायच्या माध्यमाने इंटरनेट सेवा वापरण्याची परवानगी तेव्हाच दिली जाईल, जेव्हा त्या उंचीवर पोहोचल्यानंतरही विमानात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापराची परवानगी दिली जाते, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"