रयतेच्या राजाला `छावा`चा मुजरा!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
रायगड : छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता विकी कौशल याने शिवजयंतीनिमित्त खास फोटो शेअर केले आहेत. आधीच सिनेमातील उत्तम अभिनयामुळे कौतुक होत असलेल्या विकी कौशलवर पुन्हा एकदा चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
आज शिवजयंती. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जगभरात उत्सव साजरा होत आहे. महाराजांवर लिहिलेले पोवाडे, मिरवणुका, मूर्तीला अभिवादन याद्वारे शिवाजी महाराजांचे स्मरण केले जात आहे.
शिवजयंतीनिमित्त विकी कौशल याने आज रायगडाला भेट दिली. छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर रायगडावर येण्याचा शब्द त्याने यानिमित्ताने पाळला. सध्या विकी कौशलचा छावा सिनेमा चांगलाच गाजतो आहे. सिनेमाचे आणि विकीच्या अभिनयाचे जोरदार कौतुक केले जात आहे. त्या आनंदाप्रित्यर्थ आणि शिवजयंती साजरी करण्याच्या निमित्ताने विकीने सिनेमाच्या टीमसह रायगडाला भेट दिली. पांढरा कुर्ता आणि डोक्यावर फेटा बांधून विकी रायगडावरील सिंहासनारूढ छत्रपती शिवरायांचरणी नतमस्तक झाला. त्याला भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.