28 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ क्रमांक एक, दोन व तीन मधील एकूण 28 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. या गुन्हेगारांवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.
तडीपार केलेल्यांमध्ये आयुब चमन खान (रा. अंकुश चौक निगडी), विशाल उर्फ डेंगल्या रामधन खरात ( रा. ओटा स्कीम निगडी), रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (रा. पवारनगर थेरगाव), मयूर सुहास मोरे (मावळ),यशोदास विजय राठोड आकाश रवी महिनावत (दोघे रा. ओझर्डे, मावळ), गौरव उर्फ बॉक्सर बन्सी ढसाळ, रोहित महादेव सोनवणे, ऋतिक बंशी ढसाळ (तिघे रा वाकड) ,धीरज दादा वाघमारे (रा थेरगाव) अमन अमिन शेख (रा. देहूरोड), मंगलसिंग पोलाद सिंग भोंड (रा. आदर्श नगर ,दिघी), अशोक उर्फ नव्या सुतल गोंधले, रोहित बापू पारवे, बालाजी शिंदे ,अरुण अनिल गोटे (सर्व बालाजी नगर, भोसरी), नितीन पोपट तांबे (रा. निमगाव, खेड), विक्रांत विठ्ठल राऊत (रा .मामुर्डी, देहूरोड) योगेश दत्ता लहाने (रा. मोरे वस्ती, चिखली), केतन प्रकाश शिंदे (रा. आळंदी) यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

आकाश अतुल कदम (रा अंकुश चौक, निगडी), शुभम उर्फ सोन्या सुनील गायकवाड (गांधीनगर पिंपरी), अनिकेत दत्ता वाघमारे (रा. नेहरूनगर, पिंपरी), शुभम बबन नावळे (रा. पिंपळे गुरव), प्रशांत अरुण दुबे (रा. तळेगाव दाभाडे), अरुण गब्बर रजपूत, परशुराम प्रदीप ढेपे ,हरी ओम लक्ष्मण जोगदंड (दोघे रा. भोसरी एमआयडीसी), पायल रोहित कुंभार (रा. डुडुळगाव ),सनी विजय शहा (रा. नारायणगाव, जुन्नर) यांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
गंगाधर देवेंद्र नाटेकर (रा. रमाबाई नगर, रावेत), अजय सुखदेव माने (रा. धानोरी), अर्जुन पूनम कुंभार (रा. निंबाळकरनगर ,ताथवडे), सागर उर्फ रत्नदीप सत्यवान कांबळे (रा. बालाजीनगर ,भोसरी), राजकुमार रामपूरम सिंह (रा. चाकण) या गुन्हेगारांना सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने परिमंडळ एक, दोन,तीन पिंपरी चिंचवड कार्य क्षेत्रातील शंभरहून अधिक गुन्हेगारांचे हालचालीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर व अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या आदेशानुसार तडीपारीची कारवाई गुन्हेगारांवर करण्यात आली. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे ही माहिती दिली आहे.

