घरगुती गॅस सिलेंडर मधून रिफिलिंग करणाऱ्या आरोपीस अटक!

पिंपरी : धोकादायक पद्धतीने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून अन्य गॅस सिलेंडर मध्ये रिफिलिंग करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवार 25 मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास रोहित गॅस सर्विस, मोरे वस्ती, चिखली येथे घडली.

याप्रकरणी रोहित प्रभाकर शिंदे (वय 27, रा. मोरेवस्ती, नामदेव सोसायटी चिंचेचा मळा, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी समीर लक्ष्मण रासकर पोलीस शिपाई, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रोहित शिंदे यांनी घरगुती वापराच्या सिलेंडर मधून अन्य छोट्या गॅस सिलेंडर मध्ये रिफिलिंग करण्याच्या नोझलच्या साह्याने अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता रिफिलिंग करत असताना पोलिसांनी छापा टाकून आरोपीला अटक केले .सदर ठिकाणी विक्रीसाठी साठा केलेले 13500 किंमतीचे लहान-मोठे भरलेले गॅस सिलेंडर व रिकाम्या टाक्या, एक वजन काटा मुद्देमालासह मिळून आला आहे. चिखली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकुळे पुढील तपास करत आहेत.

