फरार असलेले अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर पोलिसांच्या ताब्यात!

नितीन गिलबिले यांच्या हत्येप्रकरण
नितीन गिलेबिले यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेले अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे नितीनच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश येईल. दोन दिवसापूर्वी नितीन गिलबिलेची वडमुखवाडी ,अलंकापुरम रोड लगत फॉर्च्यूनर गाडीत पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या केली होती .हत्येनंतर अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर दोघेही फरार झाले होते .

नितीन गिलबिले हत्याप्रकरणी फरार असलेल्य विक्रांत ठाकूर याला लोणावळा ॲम्बी व्हॅली परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. अमित पठारे याला वाघोलीतून ताब्यात घेण्यात आले आहे. प्लॉटिंग आणि संपत्तीच्या वादावरून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे .दोन दिवसापूर्वी फॉर्च्यूनर गाडीत नितीन गिलबिले याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती .नितीन गिलबिले याची हत्या केल्यानंतर त्याला रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच फेकून अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर फरार झाले होते .हत्येचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे .अत्यंत क्रूरपणे जवळून गोळ्या घालून गिलबिले याची हत्या करण्यात आली आहे. नितीन गिलबिले चा खुनी सापडला
पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, मारुती जगताप ,सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी स्वप्निल लांडगे, योगेश नागरगोजे ,सुधीर डोळस ,नितीन लवटे यांच्या टीमने ही कारवाई केली.

