फुले वाड्यासाठी आंदोलन करण्यास सक्षम : ज्येष्ठ नेते छगन भुजबळ

पुणे: महात्मा फुले वाड्याच्या कामासाठी मला उपोषण करावे लागले तरी चालेल .महात्मा फुले वाड्याच्या रखडलेल्या कामावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॅांग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली .या ऐतिहासिक वाड्याचे काम शंभर ते दोनशे कोटी रुपयांचे आहे. अनेक वर्षापासून हे काम संत गतीने सुरू आहे. अनेक वर्षांपासून फुले वाड्यातील कामाला गती मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे ,ही जागा देशाला अर्पण झाली आहे.

येथे येणाऱ्या लोकांसाठी सुविधा नाहीत. सभा घेण्यासाठी ही जागा नाही .तरीही अधिकाऱ्यांकडून फक्त टोलवाटोलवी होत आहे .अशी टीका त्यांनी करून आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे .आपण फक्त आमदार आहे. राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना जागा मिळाली नाही, त्यानंतर ते नाराज असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. आता देखील त्यांनी आपण .सत्ताधारी सरकारचे फक्त आमदार आहोत, त्यामुळे आंदोलन करण्यास कोणताही कोणतीही अडचण येणार नाही. फुले वाड्यासाठी जमिनीच्या आधीग्रहणाबाबत मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत ,मात्र पुणे पालिका अधिकारी निष्क्रिय आहेत असा आरोप भुजबळ यांनी केला.जागा ताब्यात घेण्यास ते उदासीन आहेत ,अशी थेट टीका त्यांनी केली.