दिघी मध्ये जिम ट्रेनर तरुणीकडून मित्राच्या मदतीने युवकाच्या हत्या!

दोघांना अटक
पिंपरी : दिघी चर्होली फाट्याजवळ एका तरुणीने मित्राच्या मदतीने एकाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे .मयत तरुण वारंवार तरुणीला त्रास द्यायचा त्यातून.ही घटना घडल्याचं आतापर्यंतच्या प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी तरुणी आणि तरुण हे जिम ट्रेनर असून मयत तरुणाची जिम मध्येच त्यांच्याशी ओळख झाली होती . गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे (25) असे मयत तरुणाचे नाव आहे .

यश पाटोळे आणि प्रांजल तावरे अशी आरोपी जिम ट्रेनर ची नावे आहेत . दोघांचे प्रोटीन पझल नावाचे दुकान आहे.जिम ट्रेनर असलेल्या प्रांजल सोबत बुधवारी अडीचच्या सुमारास लल्ला वर्पे यांच्याकडून त्रास देण्याचा तोच प्रकार घडला. यावेळी प्रांजलने गोपीनाथ च्या कानशिलात लगावली, त्यानंतर तिने आणि यशने मिळून लोखंडी रॉड आणि पहाराने मारहाण केली .यात गोपीनाथ गंभीर जखमी झाला होता .जखमी अवस्थेत गोपीनाथला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
त्यानंतर प्रांजल आणि यश स्वतः दिघी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर झाले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. प्रांजल आणि यश ज्या जिम चे ट्रेनर आहेत त्याच जिम मध्ये गोपीनाथ जिमला येत होता. तिथेच त्यांची वर्षभरापूर्वी ओळख झाली. मात्र गोपीनाथ प्रांजल कडे पैशाची मागणी का करत होता? तो तिला शिवीगाळ करून कात्रज त्रास देत होता ? असा आरोप केला जात आहे. मात्र हे अद्यापही अस्पष्ट आहे . यश पाटोळे आणि प्रांजल तावरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. दिघी पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.