फक्त मुद्द्याचं!

17th March 2026
गुन्हेगारी

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वराच्या पाठीमागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू!

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वराच्या पाठीमागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू!

पिंपरी : भरधाव वेगात ट्रक चालवून दुचाकी स्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वराच्या पाठीमागे बसलेला तरुण मृत्यू पावला. शनिवार 14 मार्च रोजी सकाळी पावणेदहाचे सुमारास आदिरा रा इंटरनॅशनल स्कूलच्या समोर , जांबे गावाकडे जाणाऱ्या रोडवर घडली. या धडकेत स्वप्निल पिंटू चव्हाण (वय 15) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

लक्षदीप दिलीप राठोड (रा. पारके, यांच्या खोलीमध्ये सावता माळी मंदिर जवळ पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .ट्रकचालक समाधान रामदास माने (वय 27,निलेश मराठे यांच्या रूममध्ये भाड्याने, जिल्हा परिषद शाळेजवळ वराळे, ता. मावळ) हा आरोपी अटक आहे. वाहन मालक किरण मोहनराव काकडे (रा. तळेगाव दाभाडे )यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व फिर्यादीचा नातेवाईक मित्र स्वप्नील पिंटू चव्हाण (वय. 15) असे मोटरसायकल क्रमांक( एम एच 45 सी एन 27 42) वरून राहते घरी परत येत असताना हायवा ट्रक क्रमांक (एम एच 14 डीएम 97 11) ट्रकने दुचाकी स्वराला जोरदार धडक दिली. या धडकेत फिर्यादी किरकोळ जखमी झाला तर फिर्यादीचा नातेवाईक मित्र स्वप्नील पिंटू चव्हाण यास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. रावेत पोलीस ठाण्याचे

viara vcc
viara vcc

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"