फक्त मुद्द्याचं!

20th April 2025
गुन्हेगारी

10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात महिला डॉक्टरने आयुष्य संपवलं!

10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात महिला डॉक्टरने  आयुष्य संपवलं!

पुणे : आजकाल डेटींग किंवा मॅट्रिमोनी वेबसाईटवरून अनेक फसवणूकीचे प्रकार समोर येत असून पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिले लग्न झालेले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम साईटवर अविवाहित असल्याचं भासवत लग्नाचं आमिष दाखवून तरुणीकडून 10 लाख रुपये घेत लग्नाला नकार दिला. हा मानसिक धक्का पचवू न शकलेल्या डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाणा हद्दीत ही घटना घडली असून पल्लवी पोपट फडतरे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. यात फसवणूक करणाऱ्या आरोपी कुलदीप आदिनाथ सावंतवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविवाहित असल्याचं भासवत केली फसवणूक
पहिले लग्न झालेले असतानाही जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवत 25 वर्षीय डॉक्टर महिलेला कुलदीप सावंत या तरुणाने संपर्क साधला . या वेबसाईटवरच मैत्री करत लग्नाचे आमिष दाखवले . लग्नाचं वचन देत डॉक्टर महिलेकडून 10 लाख रुपये उकळले . पैसे मिळाल्यानंतर तिला आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. दहा लाख रुपये घेऊन लग्नाला नकार दिल्याचा मानसिक धक्का न पचवू शकलेल्या डॉक्टर तरुणीने क्लिनिकमध्येच विषारी औषध घेत आत्महत्या केली आहे . हा धक्कादायक प्रकारसमोर आल्यानंतर लग्नाचे आम्ही दाखवत दहा लाख रुपये उकळणाऱ्या कुलदीप सावंत या आरोपी विरोधात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय . या आरोपीजवळ असणारे लपटॉपही पोलिसांनी जप्त केले आहेत.

मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून ओळख वाढवताना सावधान
सध्या मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून ओळख वाढवून फसवणूकीचे अनेक प्रकार समोर येत असून लग्नाचं आमिष दाखवत लाखो रुपये उकळले असल्याच्या घटना घडत आहेत. अनेकदा ऑनलाईन डेटींगच्या नावाखाली ओळख लपवून, वेगळंच नाव वापरून किंवा मैत्रीचा हात पुढे करून नंतर पैसे उकळले जात असल्याच्या घटना घडत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"