लहान मुलांसाठी मराठीची ऑनलाइन कार्यशाळा

सिल्वर इंक मीडिया प्रा. लिमिटेड आणि मुंबईतील ग म भ न मराठी भाषा कार्यशाळेचा उपक्रम
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी/मुंबई : इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव पाहता मायबोली मराठीकडे सहाजिकच दुर्लक्ष केले जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन सिल्वर इंक मीडिया प्रा. लिमिटेड आणि मुंबईतील ग म भ न मराठी भाषा कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवारी मराठी भाषेची अनोखी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

जगभरातील अधिकाधिक मुलांना यात सहभागी होता यावे, यासाठी ही कार्यशाळा ऑनलाइन स्वरूपाची आहे. येत्या सोमवारी (११ ऑगस्ट) सायंकाळी सात वाजता ही कार्यशाळा होईल. मराठी भाषेतील उत्तमोत्तम गोष्टी, कविता, गाणी मुलांपर्यंत पोहोचविणे हे ग म भ न मराठी भाषा कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. याखेरीज भाषा रुजण्यासाठी देखील प्रयत्न केले जातात. मुलांचा शब्दसंग्रह वाढावा यासाठी वेगवेगळ्या रंजक खेळांची आखणी केली जाते. यामध्ये मुले उत्साहाने भाग घेतात. मार्च महिन्यापासून प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा स्वरूपाच्या कार्यशाळा घेतल्या जात आहेत. चौथी, पाचवीच्या मुलांसाठी मराठी भाषेच्या व्याकरणाचे सोप्या पद्धतीने मार्गदर्शन, लेखन कौशल्य, संभाषण कौशल्य, एकपात्री सादरीकरण अशा अनेक वैशिष्यपूर्ण सत्रांची रचना यामध्ये केली जाते.

विद्यावाचस्पति (डॉ.) गौतमी पाटील आणि सिल्वर इंक मीडियाच्या संचालिका सीमा देसाई यांनी मिळून या उपक्रमाची आखणी केली आहे. मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. कार्यशाळेसाठी अगदी नाममात्र शंभर रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – डॉ. गौतमी पाटील (9920898979), सीमा देसाई (9881098431).