दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा डंपर धडकेत मृत्यू!

पिंपरी : दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या पंधरा वर्षाचा मुलगा शाळेतून सायकलवरुन राहते घरी येत असताना मिक्सर डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत त्याचा मृत्यू झाला. ही घटना साई कॅफे चौक, प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे घडली. फारुक शकील तांबोळी (वय 15) मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

याबाबत मयत मुलाचे वडील शकील आदम तांबोळी (वय 45, रा. शिवशाही कॉलनी, भुलेश्वर मंदिराजवळ चिंचवडे नगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. निवृत्ती उद्धव गिरी (वय 39, रा. पद्मावती रोड, आळंदी, मुळगाव- मु. जिरडगाव ता. घनसावळी, जि. जालना) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मुलगा फारुक शकील तांबोळी (वय 15) हा काळभोर नगर येथील शाळेतून राहते घरी सायकलवरून येत असताना दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मिक्सर डंपर नंबर एम एच /14 एम एच/ 88 65 ने सायकल स्वार मुलाला जोरदार धडक दिली. डंपर चालक ट्रक चालवताना मोबाईल वरून बोलत होता. शिवाय वाहन भरधाव वेगाने असताना सायकल स्वरास जोरदार धडक दिली. चौका पाशी स्पीड बेकर असताना देखील ट्रक चालकाने स्पीड कमी केले नाही. धडक दिल्यानंतर डंपरचे चाक मुलाच्या पोटावरून घालून त्याच गंभीर जखमी केले व त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. चिंचवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करंबळकर हे तपास करत आहेत.

