फक्त मुद्द्याचं!

21st March 2026
गुन्हेगारी

परदेशी इ-सिगारेटचा सव्वादोन लाखांचा साठा जप्त!

परदेशी इ-सिगारेटचा सव्वादोन लाखांचा साठा जप्त!

पिंपरी : केंद्र सरकारने प्रतिबंध केलेल्या परदेशी बनावटीच्या इ-सिगारेटचा तब्बल २ लाख ३२ हजार रुपयांचा साठा अंमली पदार्थ विरोधी पथकाने बावधन येथे जप्त केला. रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास बावधन येथे शिंदेनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

बावधन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन महम्मद (वय २५, रा. शिंदेनगर, बावधन, मुळ – कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस हवालदार गणेश करपे यांनी रविवारी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.बावधनमधील स्मोकर्स स्टोअर या दुकानात महम्मदने परदेशी बनावटीच्या विविध कंपन्यांच्या इ-सिगारेट विक्रीसाठी साठवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी दुकानावर छापा टाकून संपूर्ण साठा जप्त केला. फौजदार हणमंत पवार तपास करीत आहेत.

viara vcc
viara vcc

वाकड येथे मोबाइल हिसकावणारे दोघे गजाआड!
पिंपरी : फोनवर बोलत असलेल्या तरुणाचा ५० हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेणार्‍या दोन चोरट्यांना वाकड पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना शनिवारी (दि. २५) पहाटे पाचच्या सुमारास घडली.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील मोहन शिंदे (वय ४०) आणि विजय शुभाष काळे (वय २१, दोघे रा. म्हातोबानगर, वाकड) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हुजेफ रफीक गोलंदाज (वय २८, रा. नळबाग, सांगली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या बहिणी रमेजा हिच्याशी मोबाइलवर स्पीकर ऑन करून बोलत असताना, काळ्या पिवळ्या रिक्षामधून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या हातातील मोबाइल जबरीने हिसकावला आणि पळ काढला. वाकड पोलिसांनी तातडीने शोध माेहिम राबवून दोघांना गजाआड केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"