फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

शोरूम किंवा डिलरशीपसाठी नोंदणी प्राधिकरणाकडून स्वतंत्र व्यापार प्रमाणपत्र आवश्यक!

शोरूम किंवा डिलरशीपसाठी नोंदणी प्राधिकरणाकडून स्वतंत्र व्यापार प्रमाणपत्र आवश्यक!

मुंबई : केंद्रीय मोटार वाहन कायदा व नियमानुसार वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक व उत्पादक यांनी व्यवसाय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार वाहनांच्या विक्री, व्यापार किवा प्रदर्शनामध्ये गुंतलेले प्रत्येक विशिष्ट प्रतिष्ठान, शोरूम किंवा डिलरशीप संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडून स्वतंत्र व्यापार प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. ट्रेड सर्टिफिकेट प्राप्त न केलेले वाहन वितरक व उत्पादक यांनी अशी वाहने विकल्यास ते मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९२ नुसार दंडास पात्र असणार आहे. अशा वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

मेसर्स ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड या कंपनीने एकच ट्रेड सर्टिफिकेट घेऊन राज्यातील विविध ठिकाणी ‘शोरूम व स्टोअर कम सर्व्हिस सेंटर’ उभारण्यात आले असल्याबाबतची तक्रार ‘प्रीतपाल सिंग अँड असोसिएट’ गुरुग्राम, यांनी केली आहे. या तक्रारीबाबत तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

३६ वाहन विक्रेत्यांवर कारवाई, ३४ वाहने जप्त
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य, पश्चिम, पूर्व), बोरिवली व पुणे या कार्यालयाच्या अंतर्गत विशेष तपासणी मोहीम राबवून ‘ ट्रेड सर्टिफिकेट’बाबत ३६ वाहन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून ३४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"