फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून शाळकरी मुलीवर अत्याचार, गाडीचालक अटकेत

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून शाळकरी मुलीवर अत्याचार, गाडीचालक अटकेत


पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.

संजय जेटींग रेड्डी (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत मुलगी एका शाळेत शिकत आहे. चार दिवसांपूर्वी मुलगी शाळेतून घरी आली. तेव्हा तिने वडिलांकडे तक्रार केली. वडिलांनी विश्वासात घेऊन मुलीकडे चौकशी केली. तेव्हा विद्यार्थी वाहतूक करणारे संजय अंकल यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. संजय अंकल माझ्याबरोबर असणाऱ्या मैत्रिणीबरोबर अश्लील कृत्य करतात, अशी माहिती तिने वडिलांना दिली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी वडिलांनी मुलीला दुचाकीवरुन शाळेत सोडले. मुलीच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन पालकांना याबाबतची माहिती दिली. पालकांनी मुलीची चौकशी केली. तेव्हा आरोपी संजय अंकल यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. त्यानंतर वानवडी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक आयुक्त गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी व्हॅन चालक रेड्डीला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक देवधर तपास करत आहेत.
पुण्यातल्या ही घटना अत्यंत निंदनीय आहे. मी बालहक्क आयोगाची अध्यक्ष म्हणून शाळा प्रशासन त्यांचं विभागीय मंडळ, विश्वस्त यांना सांगू इच्छिते की आम्ही गाइडलाइन दिल्या आहेत. त्याचं कठोर पालन झालंच पाहिजे. या प्रकरणात आम्हाला जर हे लक्षात आलं की विश्वस्तांनी, प्रशासनाने चालकाचं व्हेरिफिकेशन केलं नव्हतं तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करु. मुलांचं संरक्षण, त्यांची जबाबदारी शाळेचीही आहे असा इशारा बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशिलाबेन शहा यांनी दिला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"