दारूंब्रे येथील एक प्लॉट दोघांना विक्री ; 15 लाखाची फसवणूक!

दोघां विरुध्द गुन्हा दाखल
पिंपरी खरेदी खत केलेला चार हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट पुन्हा दुसऱ्या व्यक्तीस विकून 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दोघां विरुध्द शिरगाव तालुका मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे दारूंब्रे ता. मावळ येथील गट नंबर 72 मधील 4000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट खरेदी खत करुन प्रथम राजन मुरलीधर भालशंकर (वय 51 रा. कान्हे फाटा ,ता. मावळ जि. पुणे) यांना प्रकाश बोधुराम चौधरी (वय 41 राहणार अँड्रेस कमर्शिया, सयाजी हॉटेल जवळ ,मुंबई पुणे हायवे पुणे )व प्रदीप नथ्थु राठोड (वय 41 रा. अँड्रेस कमर्शिया ,सयाजी हॉटेल जवळ मुंबई पुणे हायवे) यांनी खरेदीखत करून दिले .त्यानंतर 19 मार्च 2024 रोजी ताबा पावती करून दिली,
खरेदी खतात असलेली चतु: सीमा न टाकता दुसऱ्या चतु:सीमा टाकून एक बनावट व खोटी साक्षीदारांच्या सह्या असलेली नोटरी करून ताबा पावती करून दिली आहे. परंतु तोच प्लॉट श्री बाबू तात्या वाकडकर यास विक्री करून फिर्यादी राजन मुरलीधर भालशंकर (वय 51 रा. कान्हे फाटा ,ता. मावळ जि. पुणे यांची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केली आहे .याप्रकरणी राजन भालशंकर यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 19 मार्च 2024 ते 4 डिसेंबर 2025 या कालावधीत घडला आहे. याबाबत प्रकाश बोधुराम चौधरी, प्रदीप नथ्थु राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.

गांजा विक्री प्रकरणी एकास अटक!
पिंपरी ! अमली पदार्थ जवळ बाळगणे गुन्हा असताना एका आरोपीने 51,550 किमतीचा 278 ग्रॅम वजनाचा गांजा जवळ बाळगल्याने एका आरोपीस पिंपरी चिंचवड गुन्हा शाखेने गुन्हा अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कपिलेश कृष्णा इगवे ,पोलीस शिपाई अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी सनी धर्मा सिंग माचरेकर (वय 21, रा. बिल्डिंग नंबर पाच ,भाट नगर, पिंपरी, मूळ रा. मु. पो. श्रमिक नगर दिक्षी रोड ,ओझर मिक, ता. निफाड, जि. नाशिक) यास गुन्हे शाखेने अटक केली आहे . आरोपीअमली पदार्थ पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील भाट नगर बिल्डिंग नंबर पाच व सहा मधील रोडवर गांजा विक्री करत होता .बेकायदेशीररीत्या विक्री करीत असताना ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून एक मोपेड ,एक मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे .

