फक्त मुद्द्याचं!

12th March 2026
गुन्हेगारी

हळद खरेदी करुन एका व्यक्तीची 11 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक!

हळद खरेदी करुन एका व्यक्तीची 11 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : गारविन स्पाइसेस अँड फुड प्रोडक्ट कॉर्पोरेशन कंपनी करिता एका व्यक्तीकडून हळद खरेदी करण्याकरिता करार करून फिर्यादीची 11 लाख 65 हजार 278 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 9 जुलै 2025 ते 29 जुलै 2025 या कालावधीत हॉट अँड स्पायसी चायनीज सेंटरचा, स्पाइन कासा, प्लॉट नंबर 49, शॉप नंबर सहा, राजे शिवाजीनगर, चिखली येथे घडली

याप्रकरणी चेतन मधुकर भोसले (वय 42, रा. सत्यम रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर तीनशे तीन, प्लॉट नंबर 57 ,सेक्टर नंबर 16, राजे शिवाजीनगर चिखली, मुळगाव चिंधवली, ता. वाई जि. सातारा) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विनोद शांताराम सायगावकर (जि. रायगड, नवी मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी त्यांच्या गारवीन स्पाईसेस अँड फूड प्रॉडक्ट कार्पोरेशन कंपनी करिता फिर्यादी यांच्याकडून 18 लाख 35 हजार 278 रुपये किमतीची हळद खरेदी करण्याचा करार केला. हळद खरेदी केल्यानंतर सहा लाख 70 हजार रुपये फिर्यादीला दिले. मात्र उर्वरित हळदीच्या मालाचे 11 लाख 65 हजार 278 रुपये न देता फिर्यादीची फसवणूक केली. चिखली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

गांजा विक्रीकरिता बाळगल्याने एका व्यक्तीस अटक!
पिंपरी : बेकायदेशीररित्या अमली पदार्थ गांजा विक्रीकरिता जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवार 11 मार्च रोजी सव्वा बाराच्या सुमारास दिघी पोलीस स्टेशन हद्दीत चैतन्य पान दरबार समोर ,आझाद नगर चर्होली येथे घडली.

या प्रकरणी चंद्रकांत छबु जाधव पोलीस शिपाई अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. राजेंद्र विष्णू आदुडे (वय 39, रा. दाभाडे वस्ती, घारे ट्रॅक्टरच्या बाजूला, चर्होली, ता. हवेली, मूळ रा. गजानन नगर, गल्ली नंबर 10, गारखेड परिसर छत्रपती संभाजी नगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी क्रमांक.दोन मलकेकर (भाटनगर पिंपरी) यांचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजेंद्र अधुरे यांनी 22 हजार 800 रुपये किमतीचा 240 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा अनाधिकृतपणे विक्रीकरिता जवळ बाळगला. आरोपीकडे मोबाईल, रोख रकम मिळून आली आहे. आरोपीने गांजा कुठून व कोणाकडून आणला याबाबत त्याच्याकडे चौकशी करता त्याने आरोपी क्रमांक दोन मलकेकर (रा. भाटनगर, पिंपरी) यांच्याकडून आणल्याचे सांगितले. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"