फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय एका व्यक्तीस अटक!

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय एका व्यक्तीस अटक!

पिंपरी : स्पा सेंटर च्या नावाखाली पीडित महिलेस पैशाचे आमीष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून आपली उपजीविका करणाऱ्या दोन व्यक्तींविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लेमन ग्रास थाई स्पा शॉप नंबर 403, चौथा मजला, रॉयल ट्रॅान्कीअल बिल्डिंग ,चितळे बंधू स्वीट्स, कोकणे चौक ,पिंपळे सौदागर येथे गुरुवार 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. नीलम संतोष बुचडे पोलीस हवालदार ,अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .ओंकार विनायक जोशी (वय 26, सध्या रा. घर. नंबर दहा ,शामसुंदर सोसायटी, म्हात्रे ब्रिज, दत्तवाडी पुणे) व कल्याण भोसले (वय 43, पूर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथे त्यांना मिळालेल्या माहितीनुसार लेमन ग्रास थाई स्पा, शॉप नंबर 403, रॉयल ट्रॅान्कीअल बिल्डिंग येथे स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक वेश्या व्यवसाय केला जात आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करून आरोपी ओंकार विनायक जोशी यास अटक केली आहे. आरोपी क्रमांक दोन हा फरार आहे. रॉयल ट्रॅान्कीअल बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावर आठवी ते बारावीपर्यंत एम्स इन्स्टिट्यूटचे क्लासेस, दुसऱ्या मजल्यावर शॉप नंबर 204 मध्ये डॉक्टर हिना खेराजनी यांचे स्किन क्लिनिक, तसेच शॉप नंबर 202 मध्ये अनन्या पेटकर यांचे हॉस्पिटल आहे. वैद्यकीय व शैक्षणिक सेवा देणारे सार्वजनिक ठिकाणी हा स्पा व्यवसाय चालवला जात होता. काळेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय एका व्यक्तीस अटक

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"