अवैधरित्या देशी बनावटीचे दोन पिस्तूल बाळगल्याने एका व्यक्तीस अटक!

पिंपरी :अवैधरित्या आदेशाचा भंग करून देशी बनावटीचे दोन पिस्तूल व दोन काडतुसे जवळ बाळगल्याच्या प्रकरणी एका व्यक्तीस वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना वळूमाता डेरी फार्मच्या भिंतीजवळ, रावेत- औंध रोडवर ताथवडे येथे गुरुवार 11 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी विक्रम हंबीरराव जगदाळे सहाय्यक पोलीस फौजदार, गुंडाविरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर लक्ष्मण इचगच (वय 27, रा अक्षय बुचडे यांचे भाडेचे खोलीत, बुचडे चाळ मारुंजी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर इजगज याने एक लाख रुपये किमतीची दोन पिस्तूल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगले असल्याची माहिती मिळाली नुसार पोलिसांनी आरोपीची झडती घेतली, असता दोन पिस्तूल आणि काडतुसे मिळून आली. वाकड पोलीस या प्रकरणी तपास करत आहे

बहिणीच्या लग्नाला आला नाही म्हणून एका व्यक्तीस बेदम मारहाण!
पिंपरी: बहिणीच्या लग्नाला आला नाही म्हणून एका व्यक्तीला पाच जणांनी पकडून बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना गुरुवार ११ डिसेंबर रोजी श्रद्धा कॉलनी, ज्योतिबा नगर ,काळेवाडी येथे रात्री दीडच्या सुमारास घडली .
याप्रकरणी सुरज गयाप्रसाद यादव (वय 36, महाराष्ट्र कॉलनी, सॅनल शेख यांचे खोलीत भाड्याने अय्यप्पा मंदिराजवळ, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे .याप्रकरणी विजय यादव, अजय यादव, संकेत सुपेकर, संतोष कुर्वत सर्व राहणार काळेवाडी यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांच्या बहिणीच्या लग्नाला फिर्यादी गेला नसल्याने त्यांच्या मनात राग होता. फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने याला पकडा, याला आज जिवंत सोडायचे नाही असे म्हणून फिर्यादीवर हल्ला केला ,आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादीची मान काखेत जोरात दाबून धरल्याने फिर्यादीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. फिर्यादी झटपट करून सुटण्याचा प्रयत्न करीत असता पाठीमागून आरोपी क्रमांक एक यांनी जोरात दाबून धरले .आरोपी तीन याने दांडक्याने फिर्यादीचे डोक्यात दंडुक्याने मार केला. आरोपी चार व पाच यांनी शिवीगाळ करत मारहाण केली याप्रकरणी काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

