फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

दारू पिण्याची पैज;एका व्यक्तीचा मृत्यू!

दारू पिण्याची पैज;एका व्यक्तीचा मृत्यू!

मयत व्यक्तीच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट; एकास अटक
पिंपरी: जास्तीत जास्त दारू पिण्याची पैज लावून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मयत व्यक्तीच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केला. याप्रकरणी दोघाविरुद्ध फिर्याद दाखल झाली असून एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही घटना 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नऊ लाख उंबरे गावचे हद्दीत सागर शेटे यांच्या मालकीच्या जमीन गट क्रमांक 490 मध्ये ता. मावळ येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी दीपक रंजनराव खरात पोलीस उपनिरीक्षक, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे, यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कृष्णा सिंह (वय 35, सध्या रा. सागर बबन शेट्टी यांच्या रूममध्ये, नवलखा उंबरे, ता. मावळ, मूळ पत्ता. घोरडीहा, ता. करगहर, जि. रोहतास, बिहार) व विकास कुमार (नाव पत्ता माहीत नाही) अशी आरोपींची नावे आहेत.यापैकी आरोपी क्रमांक एक याला अटक करण्यात आली आहे. आरोपी यांनी मयत रामकुमार साह यास जास्तीत जास्त कोण दारू पिते यावरून पैज लावली. अति दारूचे प्रमाण झाल्याने रामकुमार सहा यांची तब्येत बिघडली. त्यास वैद्यकीय उपचार न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर प्रेताची परस्पर विल्हेवाट लावून आरोपींनी पुरावा नष्ट केला.याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस उपनिरीक्षक रेळेकर हे तपास करत आहेत.

गावठी हातभट्टी वर छापा;सहा हजार लिटरचे कच्चे रसायन नष्ट!
पिंपरी : बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची तयार दारू व एकूण सहा हजार लिटरचे कच्चे रसायन असा एकूण तीन लाख चार हजार रुपये किमतीचे साहित्य तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी छापा टाकून जप्त केले. ही कारवाई बुधवार 7 जानेवारी रोजी पावणे पाचच्या सुमारास मौजे अंबी, गावचे हद्दीत कंजरभट वस्ती येथे, ओढ्याच्या कडेला ता. मावळ येथे घडली.

याप्रकरणी रमेश सोमीनाथ घुले पोलीस शिपाई, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे, यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका महिला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला हिने बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची तयार दारू व एकूण सहा हजार लिटरचे कच्चे रसायन असा एकूण तीन लाख चार हजार रुपये किमतीचा माल ताब्यात ठेवला. पोलिसांनी छापा टाकल्याचे कळताच आरोपीने तेथून पलायन केले. पोलिसांनी कच्ये रसायन ताब्यात घेऊन नष्ट केले. याप्रकरणी पोलीस हवालदार मरागजे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"