फक्त मुद्द्याचं!

27th March 2026
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलाने 4 लाख 44 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन लांबविली!

अल्पवयीन मुलाने 4 लाख 44 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन लांबविली!

पिंपरी : अल्पवयीन मुलाने एक्टिवा दुचाकीवरून येऊन 4 लाख 44 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना गुरुवार 26 मार्च रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास घाटे वस्ती, आंबेठाण ,ता. खेड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी रुपेश अंबुदास कौटकर (वय 38 रा. मु. पोस्ट. काळूस, ता. खेड )यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी अल्पवयीन आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी त्यांच्या मालकीच्या एक्टिवा (एम. एच. 14, एल.आर/ 14 61) या दुचाकीवरून फोकलॅंड ऑपरेटर राजेश कुशवाह यांच्या समवेत महाळुंगे कडून आंबेठाण येथे जात असताना घाटे वस्ती आंबेठाण येथे आले असता आरोपी फिर्यादीचे पाठीमागून ॲक्टीव्हा दुचाकी मोटर सायकलवर येऊन फिर्यादीच्या गळ्यातील एकूण 34 .980 ग्रॅम वजनाची 4 लाख 44 हजार किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून चोरी करून निघून गेले. उत्तर माहाळुंगे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"