दोन पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात!

पिंपरी : मनाई आदेशाचा भंग करून एक लाख रुपये किमतीची देशी बनावटीची दोन पिस्तूल बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना पिंपरी ब्रिज जवळ .शंकर मंदिरा शेजारी बुधवार 10 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांच्या सुमारास घडली . पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी ही कारवाई केली.
पप्पी सिंग (वय अंदाजे 35 रा. उमरटी , मध्य प्रदेश पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यामार्फत ही पिस्तुले आणली असल्याचे अल्पवयीन आरोपीने पोलिसांना सांगितले. आरोपी पप्पी सिंग फरार असून त्याचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत. याबाबत समीर लक्ष्मण ढवळे वय 25 पिंपरी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

‘एमडी’ अमली पदार्थ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक!
पिंपरी : एमडी सदृश्य अमली पदार्थ पाच ग्रॅम विक्री करण्यासाठी बाळगल्याने एका व्यक्तीस काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई अशोका सोसायटी मधील पान हब शॉपच्या बाजूला बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून 35 मिनिटांच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी प्रमोद ज्ञानदेव कदम पोलीस हवालदार काळेवाडी पोलीस स्टेशन यांनी फिर्यादी दिली आहे . पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ,रात्रीचे पेट्रोलिंग करताना संशयित आरोपी पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्याच्याकडे चौकशी करून त्याची झडती घेतली असता एमडी सदृश्य पाच ग्रॅम अमली पदार्थ किंमत साठ हजार रुपये मिळून आला. .प्रथम गणेश पसाले (वय 23 ,रा. रत्ना निवास सर्वे नंबर 17 / 4 वाकड रोड, मंगल नगर ,संत ज्ञानेश्वर कॉलनी लेन नंबर सहा ,थेरगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गुरव हे पुढील तपास करत आहेत.

