फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

‘फेंगल’ चक्रीवादळामुळे अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा!

‘फेंगल’ चक्रीवादळामुळे अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा!

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान घटल्यानं चांगलाच गारठा वाढला होता. पण आता गारठा कमी होणार असून राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाल्याचं IMD नं सांगितलं आहे. बंगालच्या उपसागरात शनिवारी धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने तमिळनाडूमध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता अरबी समुद्रावर आला आहे. परिणामी महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी मध्य व दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही जिल्ह्यांना पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे.
भारतीय हवामान विभागाचे पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी माध्यमावर याबाबत माहिती दिली असून फेंगल चक्रीवादळामुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता अरबी समुद्रावर आल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, तळ कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे.
पावसाची शक्यता?
तळकोकणात सिंधूदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ही शक्यता पुढील ३ दिवस राहण्याची शक्यता असून ५ डिसेंबरला पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. ६ जिल्ह्यांना हवामान विभागानं गुरुवारी पावसाचा यलो अलर्टही दिला आहे

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"