फक्त मुद्द्याचं!

3rd September 2025
महाराष्ट्र

‘श्रीमंत दगडूशेठ गणपती’ची आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातून भव्य मिरवणुक!

‘श्रीमंत दगडूशेठ गणपती’ची आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातून भव्य मिरवणुक!

अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजचार्य ,श्री झालरिया पिठाधीश्वर श्री श्री 1008 परमपूज्य स्वामी घनश्यामचार्य महाराज यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ श्रीची प्राणप्रतिष्ठापना
पुणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून सकाळी नऊ वाजता गणपती बाप्पा मोरया ,मंगलमूर्ती मोरया चा जयघोषात आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातून निघालेल्या दिमागदार मिरवणुकीने वाजत गाजत श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या जय गणेश प्रांगणातील साकारलेल्या प्रतिकृतीमध्ये श्रीमंत दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले .

viara vcc
viara vcc

गणेश चतुर्थीला उत्सवाची पारंपारिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे केरळ मधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मध्यप्रदेश चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित श्री जगद्गुरु श्री रामानुजाचार्य , श्री झालरिया पिठाधीश्वर श्री 1008 परमपूज्य स्वामी घनशामाचार्य महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली .यावेळी यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे , उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी , सरचिटणीस व आमदार हेमंत रासने , सहचिटणीस अमोल केदारी , उत्सव प्रमुख अक्षय गोडसे , सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने ,सौरभ रायकर ,तुषार रायकर ,मंगेश सूर्यवंशी ,अमोल चव्हाण, विनायक रासने यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य मंदिरापासून फुलांनी सजवलेल्या आकर्षक रथातून श्रींची मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक फुलांनी सजावट आणि रथावर भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती लावण्यात आली होती. आप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात मिरवणूक आली, देऊळकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई ,दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता ,

ऋषी पंचमी निमित्त 35 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठाण गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजता दरवर्षीप्रमाणे 35000 महिला सामुदायिक रित्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत .यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मदाय सहआयुक्त रजनी शिरसागर यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणराया चरणी सेवा अर्पण करणार आहेत रात्री दहा ते बारा वाजता .गणेश उत्सवा अंतर्गत सूर्यनमस्कार अग्निहोत्र वेदपठाण महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे पाच वाजल्यापासून महा अभिषेक पूजा होणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"