दान करण्याचे अमिष दाखवून 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी लांबविली!

पिंपरी: लोकांना बिस्किट वाटप करा व मंदिरामध्ये पंधराशे रुपये दानपेटीत मध्ये टाका असे सांगून दोन व्यक्तींनी 50 हजार रुपये किंमतीची गणपती बाप्पाची नक्षी असलेली आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी नकळत काढून घेऊन फसवणूक केली आहे. ही घटना सम्राट जिम च्या समोर मोशी येथे घडली.

या प्रकरणी पंडित महादू गायकवाड (वय 65, गायकवाड वस्ती, जुना टोलनाका, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . मोटरसायकल वरील दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अनोळखी आरोपींनी फिर्यादीला थांबून फिर्यादीकडे त्यांच्याकडील बिस्किटाचे पुढे व पंधराशे रुपये देऊन लोकांना बिस्किटे वाटा व पैसे मंदिराच्या दानपेटी टाका असे म्हणून फिर्यादीच्या पाया पडले.
बिस्किटाची पिशवी व पैसे फिर्यादीला देऊन फिर्यादीचे दोन्ही हात हातामध्ये घेऊन दान पुण्य करण्याची भुरळ पाडून फिर्यादीच्या हातातील पन्नास हजार रुपये किमतीची गणपती बाप्पाची नक्षी असलेली आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी नकळत काढून घेतली, व फसवणूक केली. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनेर हे पुढील तपास करत आहेत.

