फक्त मुद्द्याचं!

27th March 2026
गुन्हेगारी

जुन्या भांडणाच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने केली मारहाण;पाच जणांना अटक!

जुन्या भांडणाच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने केली मारहाण;पाच जणांना अटक!

पिंपरी: जुन्या भांडणाचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळक्याने चार जणांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवार 25 मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जय भीम नगर हॉली क्रॉस चर्च जवळ, दापोडी येथे घडली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी महेश पवन गुळवे (वय 22, रा. एसटी रोड, एप्रे चाळ, दापोडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सनी गजभिव (वय 28), नन्या उर्फ जयप्रकाश पंडित (वय 22), संदेश गजभिव (वय 23) , रोहन बनसोडे (वय 23), , प्रथमेश चलवारे (वय 24, सर्व रा. जयभीम नगर ,दापोडी), डेव्हिड उर्फ मोन्या पाटोळे (वय 22, औंध, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी क्रमांक दोन ते सहा यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व फिर्यादीचा मित्र आकाश पिंजन यांच्याबरोबर चार महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी क्रमांक एक ते सहा यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हातात लोखंडी रॉड, बांबू, बियर बॉटल घेऊन आरोपी क्रमांक एक व दोन यांनी आकाश पिंजण यास खाली पाडून बेदम मारहाण केली. शिवाय तेथेच पडलेल्या सिमेंटच्या गट्टू ने मारहाण केली. फिर्यादी व आकाश पिंजण यास डोक्याला गंभीर दुखापत करून शिवीगाळ, दमदाटी ,जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीला मारहाण करण्यापूर्वी आरोपींनी फिर्यादीचे मित्र साहिल लांडगे व रुपेश कांबळे यांना देखील मारहाण करून जखमी केले. दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"