फक्त मुद्द्याचं!

21st February 2026
गुन्हेगारी

टोळक्याचा तीन तरुणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला!

टोळक्याचा तीन तरुणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला!

पिंपरी : आम्ही या भागातील दादा आहोत असे म्हणत परिसरात दहशत निर्माण करून एका टोळक्याने तीन तरुणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवार 18 फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास अष्टविनायक चौक, मोरे वस्ती, चिखली येथे घडली .

याबाबत सिद्धेश अशोक वाघमारे (वय 18, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरीश राकेश त्रिपाठी (वय 18, रा. मोरे वस्ती, चिखली) याला अटक केली असून त्याच्यासह अमर घोडके, गणेश राठोड, सोन्या जाधव आणि एका अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी जुन्या वादाच्या कारणावरून फिर्यादी आणि त्यांच्या दोन मित्रांना गाठले आरडा ओरड करून परिसरात दहशत पसरवत त्यांनी कोयत्याने फिर्यादीच्या मित्रांच्या डोक्यावर आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. तसेच इतर आरोपींनी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

vcc 5
vcc 5

भांडणाची तडजोड करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला!
पिंपरी : भांडण मिटवून तडजोड करण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर कोयत्याने आणि दगडाने हल्ला करण्यात आला. ही घटना गुरुवार 19 फेब्रुवारी रोजी एकच्या सुमारास राजाराम नगर, वाघजाई चौक, नवी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी जखमी तरुण वेदांत मदने यांच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .याप्रकरणी प्रथमेश गणेश शिंदे (वय 19, राजाराम नगर, नवी सांगवी) आणि दोन अल्पवयीन बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंशुमन कागडा आणि विकास उर्फ विश्व कांबळे यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा वेदांत मदने आणि इतर मित्र गेले होते. त्यावेळी आरोपींनी आम्ही इथले दादा आहोत असे म्हणून आरडाओरड केला आणि जुन्या वादातून वेदांतावर कोयत्याने वार केले. तसेच त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात वेदांत गंभीर जखमी झाला आहे
.
 

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"