फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे

वाघोली केसनंद फाट्याजवळ फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले!

वाघोली केसनंद फाट्याजवळ फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले!

३ जणांचा जागीच मृत्यू
पुणे: पुण्यात वाघोली केसनंद फाट्याजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. येथे फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले. त्यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात २ मुले आणि एका व्यक्तीचा समावेश आहे. यासोबतच ६ जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना वाघोली केसनंद फाट्याजवळ घडली. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही अपघाताची दुर्देवी घटना घडलीय. यावेळी डंपरचा चालक नशेत होता अशी माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

फुटपाथवर लोकांना चिरडत गेला डंपर
या अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. ते रविवारी रात्रीच कामाच्या निमित्ताने अमरावती येथून आले होते. या फुटपाथवर एकूण १२ जण झोपले होते. तर इतर लोक फुटपाथच्या बाजूला एका झोपडीत झोपले होते. यावेळी भरधाव डंपर फुटपाथवर चढला आणि लोकांना चिरडत गेला.

आरोपी डंपर ड्रायव्हरला अटक
जेव्हा ओरडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. त्यानंतर तातडीने पोलिसांना खबर देण्यात आली. दारूच्या नशेत असलेल्या ड्रायव्हरला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर केस दाखल करण्यात आली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"