फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
गुन्हेगारी

तडीपार गुंडाककडून देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस जप्त!

तडीपार गुंडाककडून देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस जप्त!

पिंपरी :आदेशाचे उल्लंघन करून तडीपार गुंडाने देशी बनावटीचे 52 हजार रुपये किमतीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस जवळ बाळगल्याने चिंचवड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवार 17 जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास क्विन्स टाऊन शॉपिंग सेंटर समोरील मोकळ्या मैदानात, चिंचवड रेल्वे स्टेशनच्या जवळ घडली.

याबाबत लवंग पुरी बाबुराव पुरी पोलीस आमदार यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमर नानासाहेब चव्हाण (वय 27, रा. साठे कॉलनी, चिंचवडे नगर, चिंचवड) असे तडीपार आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमर नानासाहेब चव्हाण याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. तरी देखील परवानगी न घेता तो पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत दाखल झाला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोणतेही शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना आरोपीने अवैधरित्या देशी बनवतीचे 52 हजार रुपये किमतीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस जवळ बाळगले. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दुधे हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

भंगाराचे पैसे वाटण्याच्या कारणावरून पत्नीचा खून; पतीला अटक
पिंपरी: भंगाराचे पैसे वाटण्याच्या कारणावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला काठीने डोक्यात व मानेवर मारहाण करून पोटावर लाथा बुक्क्यांनी मारले. पत्नी खाली पडली असताना आरोपीने दगड उचलून मारल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 16 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याची सुमारास महाळुंगे व्ही. टी. पी. रोडच्या बाजूला झोपडी मध्ये घडली.

याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. दत्ता काळुराम जगताप (वय 30, रा.बेबड डोहळ, ता. मुळशी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या झोपडीच्या शेजारी असणाऱ्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली असताना आरोपी याने त्याची पत्नी (वय 32) हिला भंगाराचे पैसे वाटण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. काठीने डोक्यात व मानेवर मारून तसेच पोटावर लाथा बुक्क्यांनी मारले. पत्नी खाली पडली असताना आरोपीने एक दगड उचलून तिला मारले ठार मारले. तसेच फिर्यादी त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता फिर्यादीला देखील उजव्या हातावर काठीने मारले. त्यामुळे तिच्या उजव्या हाताचे करंगळी आणि अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक तांबे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"