अजित पवार यांच्या विमान अपघातांची चौकशी केंद्रीय संस्थेकडून!

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातांची चौकशी आता केंद्रीय संस्थेकडून होणार आहे. विमान अपघात तपास ब्युरो या संस्थेचे अपघाताची चौकशी सुरू केली आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर तो राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे असे केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करावी असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांच्याकडे केली होती. अपघात विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमानुसार तपास सुरू केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल. या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे .भविष्यात अशा घटना होऊ नयेत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली आहे. चौकशी अहवाल येताच त्या दृष्टीने उपयोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचे ही सहकार्य असेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही देऊ असे मंत्री नायडू यांनी म्हटले आहे.

