फक्त मुद्द्याचं!

21st March 2026
गुन्हेगारी

 उघड्यावर कचरा टाकल्याने सहा वाहन चालकांवर गुन्हा दाखल!

 उघड्यावर कचरा टाकल्याने सहा वाहन चालकांवर गुन्हा दाखल!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन, जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणाबद्दल जनजागृती केली जात असतानाही सहा वाहन मालक व चालकांनी व्यावसायिक आणि औद्योगिक स्वरूपाचा कचरा प्रक्रियेविना सार्वजनिक ठिकाणी टाकून पर्यावरणाचे प्रदूषण केले. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड मनपाच्या वतीने संबंधित सहा वाहन चालक आणि मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ६ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत ९० मीटर रोडच्या आजूबाजूला सार्वजनिक ठिकाणी मोशी येथे घडली.

navratra 9
navratra 9

पिंपरी-चिंचवड मनपाचे उप अभियंता योगेश सोपान आल्हाट (४२) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच १४/जेएल २८५०, एमएच १४/एचयु ९०३३, एमएच १४/केए २२२५, एमएच ४३/ई ४८४३, एमएच १४/डीएम ३४३३, एमएच १४/सीपी ३३७७ या क्रमांकाच्या वाहन चालक आणि मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी घरगुती, औद्योगिक आणि घातक स्वरूपाचा कचरा प्रक्रियेविना मोशी येथील ९० मीटर रस्त्याच्या कडेला व परिसरात अस्ताव्यस्त टाकलेला आढळला. हा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास जीवघेण्या आजारांचा संसर्ग पसरू शकतो हे माहित असतानाही त्यांनी हे कृत्य केले. यामुळे जलप्रदूषण, पर्यावरण प्रदूषण, जमिनीचे प्रदूषण तसेच रोगराई पसरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत भारतीय न्याय संहिता कलम २७२, २८०, २९२, जलप्रदूषण प्रतिबंध कायदा, पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"