फक्त मुद्द्याचं!

30th March 2026
गुन्हेगारी

ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वराचा मृत्यू!

ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वराचा मृत्यू!

पिंपरी : अशोक लेलँड कंपनीचा ट्रक नादुरुस्त अवस्थेत असताना दुचाकी वरील व्यक्तीने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवार 29 मार्च रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास हनुमान पुतळ्याच्या समोरील जुन्या पुणे मुंबई रोड, ग्रेड सेपरेटर रोडवर ,काळभोर नगर, चिंचवड येथे घडली.

viara vcc
viara vcc

या अपघात प्रकरणी सचिन विठ्ठल जाधव पोलीस हवालदार ,पिंपरी पोलीस स्टेशन यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तेजस संजय निजामपूरकर (वय 32 सर्वे नंबर 51 214 सेक्टर नंबर 25, एलआयसी कॉलनी, दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ, प्राधिकरण निगडी )असे मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरील ठिकाणी एक अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच 43 बीपी 35 77 हा त्यांचे दोन्ही पाठीमागील टायर फुटल्याने रोडचे उजव्या लेनमध्ये नादुरुस्त अवस्थेत उभा होता. ट्रकचे पुढील तोंड निगडीकडे व पाठीमागील बाजू पुण्याकडे अशा स्थितीत उभा असताना मोटार सायकल क्रमांक एम एच 14 केटी 88 83 वरील चालक मयत तेजस संजय निजामपूरकर (वय 32) याने त्याच्या ताब्यातील वाहन हे बेदकारपणे व हायगयीने भरधाव वेगाने चालवून नादुरुस्त उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी स्वराच्या डोक्यास ,छातीला, तोंडाला गंभीर जखमा होऊन त्याचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे तपास करत आहेत. ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वराचा मृत्यू

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"