दिवाळीत देशवासीयांना मोठी भेट; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांची घोषणा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले .यावेळी लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना या दिवाळीत देशवासीयांना मोठी भेट मिळणार असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले की या दिवाळीत तुम्हाला खूप मोठी भेट मिळणार आहे आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून पुढच्या पिढीसाठी जीएसटी रिफॉर्म्स आणणार आहोत . दिवाळीत ही तुमची भेट ठरेल सामान्य माणसांचे कर मोठ्या प्रमाणात कमी होतील यामुळे दैनंदिन वस्तू स्वस्त होतील आणि अर्थव्यवस्थेला ही चालना मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत सलग बाराव्यांदा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे . आजच्या ध्वजारोहण कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारंगी रंगाचा फेटा , नेहरू कट जॅकेट , पांढरा शुभ्र सदरा आणि गळ्यात तिरंगी रंगाचा गमछा परिधान केला होता. या पेहरावतून स्वातंत्र्य क्रांती आणि शांतीचा संदेश देखील त्यांनी देण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान विकसित भारत योजना
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की , देशातील तरुणांनो आज मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे . आज 15 ऑगस्ट पासून माझ्या देशातील तरुणांसाठी एक लाख कोटी रुपयांची योजना राबवली जात आहे . विकसित भारत रोजगार योजना आजपासून सुरू होत आहे, या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15 हजार रुपये दिले जातील असे त्यांनी सांगितले .
पंतप्रधान पुढे म्हणाले की मी तरुणांना आवाहन करतो की , त्यांनी स्वतःचे प्लॅटफॉर्म तयार करावेत . आपण आत्मनिर्भर व्हायला हवं. सध्या आपण खतांसाठी इतरांवर अवलंबून आहोत. आपण खतांचा साठा करून ही अवलंबिताची गरज संपवू . आगामी काळात ईव्ही बॅटरीचा युग सुरू होईल . आपण त्या बॅटऱ्याही बनवू . आम्हाला आमच्या तरुणांवर पूर्ण विश्वास आहे . गेल्या अकरा वर्षात उद्योजकतेला मोठी चालना मिळाली आहे . आज लाखो स्टार्टप्स देशाला बळ देत आहेत . ल्ल्यावरून मला ऑपरेशन सिंदूर मधील वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे . आपल्या वीरांनी अशा प्रकारे हे क्षण घडवले की , ते कल्पनेपलीकडचे होते ही घटना अशी होती की , पहलगांमध्ये सीमा पार करून आलेल्या अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर नरसंहार केला . लोकांचा धर्म विचारून ओळखून त्यांची हत्या केली गेली . संपूर्ण हिंदुस्तान या घटनेनंतर संतापलेला होता . आपल्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले गेले .
ऑपरेशन सिंदूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन शेंदूर बाबत वक्तव्य केलं , ते म्हणाले की आजचा दिवस एक विशेष महत्त्वाचा दिवस आहे . खूप अभिमान वाटतो की लाल किकिस्तान मध्ये जे काही घडले त्याचा परिणाम इतका प्रचंड होता की , आजही रोज नवनवे खुलासे होत आहेत . अन्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही असा इशारा त्यांनी दिला . सिंधू पाणी वाटप करार अन्यायकारक होता हे आता देशाला समजले आहे, असेही ते म्हणाले .
आज जगभर तंत्रज्ञानाबद्दल चर्चा आणि विकास होत आहे . इथे कोणावरही टीका करण्यासाठी आलो नाही ,पण चार-पाच दशकांपूर्वी आपल्या देशात सेमीकंडक्टरबद्दल चर्चा होत होती . पण कोणीही लक्ष दिले नाही आणि ती कल्पना रद्द करण्यात आली . हा अपराध दूर करण्यासाठी सहा युनिट्स सेमीकंडक्टरचे उभारत आहोत . वर्षाच्या अखेरीस मेड इन इंडिया चिप्स आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . आज विकसित भारताचा पाया देखील स्वावलंबनावर आहे . जर स्वावलंबन कमी झाले तर ताकदही कमी होते . स्वतःच्या ताकतीचे रक्षण आणि देखभाल करण्यासाठी स्वावलंबन खूप महत्त्वाचे आहे असे अप्रत्यक्षपणे अमेरिकेला मोदी यांनी सुनावले .
आपण सुधारणा योग्यरीत्या अमलात आणण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केला आहे . 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी ही शक्ती स्थापन करण्यात आली आहे . देशाला विकसित करण्यासाठी सुधारणा नव्याने अमलात आणण्यास ही शक्ती मदत करेल . आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत आणि एक वेळ येईल जेव्हा लाल किल्ल्यावरून तुम्हाला हा संदेश दिला जाईल . आज महागाई नियंत्रणात आहे आणि आपला साठा मजबूत आहे . सूक्ष्म अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि जागतिक रेटिंग एजन्सी भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत आहेत . आपल्या देशातील शेतकरी , महिला आणि देशवासीयांना त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी सतत काम करत आहोत असे त्यांनी सांगितले .
100 वर्षांपूर्वी एक संघटना जन्माला आली त्या संघटनेने स्वतःला मातृभूमीसाठी समर्पित केले आहे . ही संस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आहे सेवा ,समर्पण , संघटना आणि अतुलनीय शिस्तीद्वारे आरएसएसने राष्ट्र उभारणीत एक अद्वितीय भूमिका बजावली आहे , ती जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनांपैकी एक मानली जाते . लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सर्व सेवकांना त्यांनी सलाम केला.
1