फक्त मुद्द्याचं!

21st March 2026
गुन्हेगारी

अभ्यासाच्या तणावातून बारावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या!

अभ्यासाच्या तणावातून बारावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या!

रावेत येथील साई मंगल सोसायटीमधील घटना
पिंपरी : अभ्यासाच्या तणावातून बारावीत शिकणार्‍या १८ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि २७) पहाटे पावणेतीनच्या सुमारास रावेत येथील साई मंगल सोसायटीमध्ये उघडकीस आली.

रावेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधूत अरविंद मोहिते (वय १८, रा. साई मंगल सोसायटी, रावेत, मुळ – वाखरी, ता. फलटण, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अवधूत हा रावेत येथील पीसीसीओ कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. सोमवारी पहाटे त्याने आपल्या खोलीतील छताच्या फॅनला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने ही घटना त्याच्या रूममेटच्या लक्षात आली. त्याने तत्काळ शेजार्‍यांच्या मदतीने अवधूतला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अवधूत हा अभ्यासू आणि शांत स्वभावाचा विद्यार्थी होता. गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या तणावात असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी व नातेवाईकांनी दिली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

viara vcc
viara vcc

उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला मारहाण!
पिंपरी : उसने दिलेले दीड लाख रुपये परत मागितल्याने संतापलेल्या शेजार्‍याने महिलेला स्टीलच्या कड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना भोसरीतील इंद्रायणीनगर येथे रविवारी (दि. २६) दुपारी दीडच्या सुमारास घडली.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल शंकर धुनघव (वय ४२, रा. लांडेवाडी, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ३० वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेने धुनघवला उसने दिलेले दीड लाख रुपये परत मागितले. या कारणावरून संतापलेल्या धुनघवने शिवीगाळ करून हातातील स्टीलच्या कड्याने महिलेच्या डोक्यावर आणि नाकावर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाली

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"