नाशिकमध्ये छापा; सापडली पाच कोटींची रक्कम

नाशिक : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. आज राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. अशातच आता नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. यात अंदाजे पाच कोटींची रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पाथर्डी फाटा येथील एका नामांकित हॉटेलमधील रुममध्ये अंदाजे पाच कोटी रुपयांची रक्कम पकडण्यात आली आहे. ही कारवाई भरारी पथकाने सोमवारी(दि. १८) केली असून रक्कम आयकर विभागाकडे जमा केली जात आहे. ही रक्कम सत्ताधारी गटातील एका राजकीय पक्षाकडून आल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून समोर येते आहे. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई केली आहे.