फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

आम्ही दोघे भाऊ..यंदा निवडणूक लढवू..

आम्ही दोघे भाऊ..यंदा निवडणूक लढवू..

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : निवडणुका म्हणल्या की नात्यागोत्याचं राजकारणही त्यात येतंच. याला कोणतीही निवडणूक अपवाद नसते. यंदा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतही अशीच भावा-भावांची जोडी वेगवेगळ्या मतदार संघांमध्ये मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे.

पती-पत्नी, भाऊ-भाऊ, काका-पुतण्या अशा अनेक जोड्या निवडणुकीच्या रिंगणात बघायला मिळतात. या जोड्या कधी आमने सामने असतात तर कधी वेगळ्या पक्षात आणि वेगवेगळ्या मतदारसंघांमध्येही असतात. मात्र, एकाच घरातून एकापेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आले की राजकारणातले वातावरण एकदम बदलून जाते.

सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच विधानसभा निवडणुकीची धामधूम बघायला मिळत आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असताना दोन्ही बाजूंना तीन-तीन मित्र पक्षांची ताकद आहे, दरम्यान काही ठिकाणी दोन्ही आघाड्यांना बंडखोरांचा फटकाही बसला आहे. काही बंडोबांना शांत करण्यात पक्षाच्या नेते मंडळींना यशही आले आहे. हे सर्व असताना असंही दिसतंय की, की यंदाच्या निवडणुकीत भाऊ- भाऊ हे नशीब आजमवत आहेत. आता या भावांपैकी कोणाला मतदार निवडून विधानसभेत पाठवणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. त्यासाठी राज्यभरात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत.

आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले हे भाऊ-भाऊ वेगवेगळ्या पक्षातीलही आहेत आणि वेगवेगळ्या मतदार संघांमधून निवडणूक लढविणारे सुद्धा आहेत. एकाच कुटुंबातले हे भाऊ आणि त्यांचे पक्ष व मतदारसंघ सविस्तर जाणून घेऊया.

निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणारे बंधू
निलेश राणे- कुडाळ (शिवसेना-एकनाथ शिंदे) – नितेश राणे– कणकवली (भाजपा)
रोहित पवार – कर्जत जामखेड (राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार) – युगेंद्र पवार – बारामती (राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार)
आदित्य ठाकरे – वरळी (शिवसेना- उद्धव ठाकरे) – अमित ठाकरे – माहिम (मनसे)
धीरज देशमुख – लातूर ग्रामीण (काँग्रेस) – अमित देशमुख – लातूर शहर (काँग्रेस)
संदीप क्षीरसागर – बीड (राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार) – योगेश क्षीरसागर – बीड (राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार)
विजयकुमार गावित – नंदूरबार (भाजपा) – राजेंद्रकुमार गावित – शहादा (काँग्रेस) – शरद गावित – नवापुर (अपक्ष)
राहुल आहेर – चांदवड (भाजपा) – केदा आहेर, चांदवड (अपक्ष)

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"