फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
महाराष्ट्र

मुंबईत २५० किलोचे फटाके जप्त

मुंबईत २५० किलोचे फटाके जप्त

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : दिवाळीनिमित्त कोणत्याही शहरात फटाक्यांचे स्टॉल उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्याचे आवाहन केलेले असताना अनेक व्यापाऱ्यांनी त्याचे पालन न करता स्टॉल उभारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याविरोधात बृहन्मुंबई महापालिकेने २५० किलो फटाके जप्त केले आहेत.

गेल्या पाच दिवसांत महापालिकेने विविध परिसरातील रस्ते, पदपथांवर विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात एकूण २५० किलो फटाके जप्त केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला. ज्या विक्रेत्यांनी फटाक्यांचा स्टॉल उभारण्यासाठी परवाने घेतलेले नाहीत, त्यांच्या विरोधात महापालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या अनुज्ञापन खात्याच्या पथकाने २५ ते २९ ऑक्टोबर दरम्यान अचानक छापा टाकून संबंधित विक्रेत्यांकडून २२९ किलो फटाके जप्त केले. परळ, अंधेरी (पश्चिम), कांदिवली, मुलुंड, कुर्ला, अंधेरी (पूर्व), वरळी आदी भागात कारवाई करण्यात आली.

शहर व उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम, प्रभादेवी परिसरातून सर्वाधिक विनापरवाना फटाके जप्त करण्यात आले. येथे १७ विभागात पालिकेच्या पथकाने अचानक धाडी टाकून विनापरवानगी फटाक्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडील फटाके जप्त करण्यात आले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"