फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
विधानसभा २०२४

राष्ट्रवादीच्या (शप) सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी

राष्ट्रवादीच्या (शप) सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर झाली असून पिंपरीतून डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चिंचवड मतदारसंघाचा उमेदवार मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून राजकीय घडामोडी, उमेदवारांची चाचपणी वेगाने झाली. आता प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. शरदचंद्र पवार गटाने आज जाहीर केलेल्या या यादीमध्ये पुण्यातील चार मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये खडकवासला, पर्वती, पिंपरी आणि जुन्नर मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे.

शरद पवारांनी निवडले युवा चेहरे
जुन्नर विधानसभेत काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर पिंपरीतून डॉ. सुलक्षणा शिलवंत यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सचिन दोडके यांना पुन्हा खडकवासला मतदारसंघातून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सचिन दोडके यांना शनिवारी एबी फॉर्मही देण्यात आला आहे. पर्वती मतदारसंघातून पुन्हा एकदा अश्विनी कदम यांना संधी देण्यात आली आहे, या मतदारसंघातून पूर्वी लढलेले सचिन तावरे देखील इच्छुक होते. काँग्रेसकडून माजी महापौर आबा बागूल व अभय छाजेड यांचे नाव चर्चेत आले होते.

आज २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा

एरंडोल – सतीश अण्णा पाटील

गंगापूर – सतीश चव्हाण

शहापूर – पांडुरंग बरोरा

भूम-परांडा – राहुल मोटे

बीड – संदीप क्षीरसागर

आर्वी – मयुरा काळे

बागलान – दीपिका चव्हाण

येवला – माणिकराव शिंदे

सिन्नर – उदय सांगळे

दिंडोरी – सुनीताताई चारोसकर

नाशिक पूर्व – गणेश गिते

उल्हासनगर – ओमी कलानी

जुन्नर – सत्यशील शेरकर

पिंपरी – सुलक्षणा शिलवंत

खडकवासला – सचिन दोडके

पर्वती – अश्विनीताई कदम

अकोले – अमित भांगरे

अहिल्यानगर शहर – अभिषेक कळमकर

माळशिरस – उत्तम जानकर

फलटण – दीपक चव्हाण

चंदगड – नंदिनीताई कुपेकर

इचलकरंजी – मदन कारंडे

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"