फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर


मुंबई : राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू होण्याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत होते. रुपाली चाकणकर यांची आमदारकीची संधी हुकली असली तरी त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आलीय. येत्या २२ तारखेला चाकणकर यांचा कार्यकाळ संपणार होता मात्र तत्पूर्वीच आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा रुपाली चाकणकर यांच्याकडे सोपवण्यात आली.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी सात आमदारांचा काल शपथविधी पार पडला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही विधान परिषदेची आमदारकी मिळणार असल्याची चर्चा होती. पण छगन भुजबळांनी आपल्या मुलासाठी हट्ट धरल्याने मग रूपाली चाकणकर यांचे नाव मागे पडले. एकाच व्यक्तीला सगळी पदं देणार का, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी विचारला होता. राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीत चाकणकर यांचे नाव नव्हते. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात निवडणुकीनंतर सत्ताबदल झाला तरी रुपाली चाकणकर यांचं पद मात्र कायम राहील. रुपाली चाकणकर या पुढची तीन वर्षे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. प्रोटोकॉलनुसार या पदाला राज्यमंञीपदाचा दर्जा आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"