फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

जगातील टॉप मध्ये पुण्यातील डीआयएटीचे पाच शास्त्रज्ञ

जगातील टॉप मध्ये पुण्यातील डीआयएटीचे पाच शास्त्रज्ञ

स्टॅनफोर्ड : पुणे येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज (डीआयएटी) येथील पाच शास्त्रज्ञांचा स्टॅनफोर्डच्या ग्लोबल टॉपने जागतिक पातळीवर काढलेल्या शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश आहे. प्रा. बालसुब्रमण्यम के., प्रा. उन्नीकृष्णन, प्रा. भास्कर मुझुमदार, प्रा. प्रशांत कुलकर्णी, प्रा. बझील राज अशी या शास्त्रज्ञांची नावे आहेत.

शिक्षण मंत्रालयाने नुकत्याच आयोजित केलेल्या एनआयआरएफ क्रमवारीत डीआयएटीने 63 वा क्रमांक मिळवला आहे. डीआयएटी हे उच्च शिक्षणाद्वारे स्वदेशी संरक्षण संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अद्वितीय संशोधन विद्यापीठ म्हणून विकसित झाले आहे. मागील पाच वर्षांपासून या प्राध्यापकांनी हे स्थान अबाधित राखले आहे. याबद्दल मागील वर्षी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या शास्त्रज्ञांचे विशेष कौतुक केले होते.

हे प्राध्यापक प्रामुख्याने संरक्षण संबंधित तंत्रज्ञानातील फ्री स्पेस कम्युनिकेशन, क्वांटम मटेरियल, क्वांटम ऑप्टिक्स, एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग, रिन्यूएबल एनर्जी, एक्सप्लोझिव्ह मटेरियल, ऑडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, हायड्रोजन स्टोरेज, रडार सिस्टीम, बॅटरी टेक्नॉलॉजीज आणि नॅनो डायरेक्ट एप्लीकेशन या संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत.

पाच शास्त्रज्ञांच्या कामगिरीचे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान आल्याबद्दल डीआयएटीचे कुलगुरू डॉ. नारायण मूर्ती यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"