फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे महाराष्ट्र

आळंदी- मरकळ रोडचे भूमिपूजन अजित पवारांच्या हस्ते संपन्न

आळंदी- मरकळ रोडचे भूमिपूजन अजित पवारांच्या हस्ते संपन्न

आळंदी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे हस्ते आळंदीमध्ये विविध विकास बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. आळंदी मरकळ रोडचे भूमिपूजन (35 कोटी रू) करण्यात आले.

आज खेड विधानसभा मतदार संघातील पहिला कार्यक्रम आळंदी नगरपरिषद शाळा इमारत क्रमांक 4 अंदाजे 5 कोटीचे भूमीपुजन करण्यात आले. तरुण पिढी शिकली पाहिजे त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत. मुला मुलींना आपल्या साधू संतांनी जो विचार सांगितला आहे त्या विचाराचे स्मरण करून दिले पाहिजे.येथील परंपरा सर्वांनी टिकवली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न महायुती सरकार सोडवण्याचे प्रयत्न करत आहे. गरीब वर्गाला जास्तीत जास्त मदत करण्याची भूमिका महायुतीची आहे.त्यातूनच वीज माफीचा निर्णय शेतकऱ्यांच्या पद्धतीने घेतला. लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेतला. मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला.जे पदवीधर आहेत , डिप्लोमा धारक आहेत व बारावी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना देखील प्रशिक्षण देण्याचे कामाचा निर्णय घेतला.

आपल्या जिल्ह्याचा चांगला विकास व्हावा.केंद्र सरकार चा निधी आपल्या कडे यावा .राज्याचा निधी आपल्या कडे यावा. देहू, आळंदी, भंडार डोंगर , पंढरपूर व महत्वाची जी तीर्थक्षेत्र असेल तिथे लाखो भाविक येतात.भाविकांना सुविधा मिळाव्यात.तसेच स्थानिक लोकांना सुविधा मिळाव्यात यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहत असे पवार म्हणाते.

यावेळी आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील,तहसीलदार ज्योती देवरे,मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पा. बा. आधिकरी सचिन गायकवाड,गिरमे,वैद्यकीय अधिकारी डॉ.उर्मिला शिंदे,राष्ट्रवादी पदाधिकारी निर्मलताई पानसरे,बाळासाहेब ठाकूर,अरुण चौधरी, डी. डी.भोसले,प्रकाश कुऱ्हाडे, पुष्पाताई कुऱ्हाडे,रुपाली पानसरे,आरिफ शेख,रोहन कुऱ्हाडे,सौरभ गव्हाणे,साहेबराव कुऱ्हाडे,निसार सय्यद व इतर मान्यवर पदाधिकारी ,ग्रामस्थ, पथ विक्रेते पदाधिकारी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"